आंदोलन...
उद्या धडकणार मारेगाव तहसीलवर बैलबंडी , ट्रॅक्टरचा मोर्चा
🔸शेतकऱ्यांच्या संवेदनशील प्रश्नावर पुकारणार एल्गार
🔸खा.बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांचे नेतृत्व
🔸मारेगाव तालुका काँग्रेसचा पुढाकार
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने पुरता मेटाकुटीस आला असून वाढत्या आत्महत्या सह महागाई , बेरोजगारीचा आलेख दिवसागणिक उच्चांक गाठत आहे.यावर तात्काळ प्रतिबंध घालून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मारेगाव तहसील कार्यालयावर उद्या दि.१२ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर , बैलबंडी मोर्चा धडकणार आहे.
स्थानिक नगरपंचायत कार्यालय समोरून दुपारी १२ वाजता निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व खा.बाळू धानोरकर , माजी आमदार वामनराव कासावार ,बाजार समिती सभापती नरेंद्र ठाकरे , अरुणा खंडाळकर करणार आहे.
तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व पुरामुळे पुरता मेटाकुटीस आला आहे.आगामी काळात जगणे असह्य होत असतांना शेतकऱ्यांकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून पिडीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी.यासह शेतकऱ्यांचे संवेदनशील , बेरोजगारी चा प्रश्नही ऐरणीवर असून वाढती महागाई सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहे.जीवनावश्यक वस्तूवरील लावलेली जीएसटी ,वाढत्या पेट्रोल डिझेल च्या किमतीने केंद्र सरकार चा निषेध आणि शेतकऱ्यांच्या संवेदनशील मागण्याच्या पूर्ततेसाठी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.
तालुक्यातील शेकडो तमाम शेतकरी तथा जनतेनी सदर आंदोलनात केंद्र सरकारचा निषेध व राज्य सरकारला जागे करण्यासाठी सहभाग दर्शवावा असे आवाहन तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी केले आहे.