वेगाव शिवारात वाघाचा मुक्काम...
कालवडीचा पाडला फडशा
🔸मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारातील सकाळची घटना
वेगाव : राजू पिपराडे
तालुक्याच्या सभोवताल वाघाचा वावर असून शेतकरी शेतमजूर कमालीचे दहशतीत असतांना आज सकाळी वाघाने कालवडीचा फडशा पाडल्याची घटना घडली.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असतांना शेतकरी , शेतमजुरांना उसंत आहे.त्यामुळे शेतात जाणे नसल्याने केवळ पशुधन चारण्यासाठी शेतकरी गावालगत पशुधनाच्या वैरणाच्या निगडीत आहे.
अशातच आज सोमवार ला सकाळी डोंगरगाव येथील शेतकरी अमर विश्वनाथ चोपणे हे आपले पशुधन चारण्यासाठी गावालगत असलेल्या धोंडूजी बांदुरकर यांच्या शेतात गेले असता दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने कालवडीवर झडप मारून आडोशाला नेले.किमान ७ हजार किमतीच्या कालवडीचा वाघाने फडशा पाडल्याने पिडीत शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले.
मारेगाव तालुक्याच्या सभोवताल वाघाचा वावर वाढला असून प्रामुख्याने शेतकरी , शेतमजुरात कमालीचे भितीचे सावट पसरले आहे.वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.