प्रसिद्ध चित्रपट अभिनेते गगन मलीक आज मारेगावात
🔸व्हिएतनाम येथील भन्तेजी यांचीही राहणार प्रमुख उपस्थिती
🔸सायंकाळी डॉ.आंबेडकर चौकात होणार आहे स्वागत
मारेगाव : प्रतिनिधी
गौतम बुद्ध चित्रपटातील व टी. व्ही.वरील राम या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांचे आज मंगळवारला मारेगाव येथे आगमन होत आहे.त्यांचे समवेत व्हिएतनाम येथील बौद्ध भिक्षु भन्ते थिक बिन ताम व थिक नीम ताम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मारेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज मंगळवार ला सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या स्वागत कार्यक्रमास तमाम जनतेंनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोण आहेत गगन मलिक ?
गगन मलिक हे भारतीय अभिनेते आहेत.गौतम बुद्ध चित्रपट व राम या टी. व्ही.सिरीयल मध्ये अभिनेता म्हणून भूमिका साकारली. 'सिद्धार्थ गौतम' या सिहली चित्रपटात बुद्धाच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या वर्ल्ड बौद्ध चित्रपट फेस्टिवल मध्ये गगन मलिक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्राप्त आहे.
अभिनेता ते भिक्षु गगण मलिक यांचा प्रवास
गगन मलिक यांनी चित्रपट ते टी. व्ही.मालिका मधील नामवंत अभिनेते म्हणून नावलौकिक मिळविला.बौद्ध चळवळीचे आंदोलक म्हणून ते उदयास येत आहे.काही वर्षापूर्वी त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन तब्बल ८४ दिवस बौद्ध भिक्षु म्हणून जीवन अर्पित केले.भारतात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गगन मलिक फाउंडेशन ची स्थापना करून ही संस्था देशभर कार्य करीत आहे.या संस्थेकडून देशात ८४, ००० बुद्ध रूपाची अष्टधातू प्रतिमा प्रदान करण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून मारेगाव तालुक्यात १०१ बुद्ध रूपाची प्रतिमा (मूर्ती )देण्याचे नियोजन आहे.त्याकरिता गगन मलिक यांच्या मारेगाव येथील धावत्या भेटीत नाव नोंद करता येणार आहे.त्याकरिता एक हजार रुपयांचे बुद्ध रूपाच्या मूर्ती रुपात धम्मदान करणे अनिवार्य असून सदर बुद्ध रूपाची मूर्ती थायलंड येथून येणार आहे आणि ती ११ इंच असणार आहेत .