शेतकऱ्याच्या उरल्या सुरल्या अशाही मावळल्या
🔸मारेगाव तालुक्यात कपाशी पिकावर मर रोगाचे आक्रमण
तालुक्यांतील पाचही मंडळातील कपाशी पिकावर मर रोगाचे आक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी तालुक्यांत ७० टक्के कपाशी पिकाची पेरणी केली. शेतकऱ्यांची कपाशी पिके फुल-पात्यांनी बहरले आहे.या सर्व पिकांवर दोन दिवसपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी पिकावर मर रोग आल्याने मोठ्याप्रमाणात कपाशीची पिके सुकू लागली आहे.
त्यामुळे पीक घरात येण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे. बी.टी. कपाशी पिकावर कोणत्या प्रकारचा रोग येत नाही, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमामात बी.टी. कपाशीचे वाण व वेगवेगळ्या जाती व कंपन्यांच्या वाणाची पेरणी करतात. मात्र बी.टी. कपाशीवर दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने मर रोगाचे आक्रमण होतात. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.
कृषितज्ज्ञांकडून यावर संशोधन करणे काळाची गरज झाली आहे. शेतकऱ्यांनी या पिकावर आतापर्यंत केलेला खर्च व मेहनत वाया गेली असून शेतकरी डबघाईस आल्याचे चित्र आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
त्यातून कसाबसा थोडाफार सावरला तर मर रोगाच्या संकटात सापडला. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी कर्ज बाजारी होत चालण्याचे चित्र असून जास्तीत जास्त शेतकरी टोकाची भूमिका घेत आत्महत्या करीत असल्याचे प्रमाण आहे.
१) अति पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ताबडतोब पाण्याचा निचरा करावा . झाडांची मुळे मलुल झाल्यामुळे अकस्मित मर रोग दिसून येत आहेसुनिल निकाळजेतालुका कृषी अधिकारी मारेगाव
२) माझ्या शेतातील दोन एकर कपाशीची पिके मर रोगाने गेली आहे,त्यामुळे माझे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील जीवनाचा गाडा हाकण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला.वचन पवारशेतकरी गोंड बुरांडा