मारेगाव : काँक्रीटीकरण रस्त्याचे भन्तेजी च्या हस्ते भूमिपूजन
🔸प्रभाग क्रमांक ११
🔸प्रशासन , पदाधिकारी , नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती
मारेगाव : प्रतिनिधी
शहराच्या विकासाचा एक भाग म्हणून मारेगाव प्रभाग क्रमांक ११ मधील काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन भन्ते करुणा बोधी यांचे हस्ते करण्यात आले.अवघ्या दिवसातच रस्त्याच्या कामाला वेग येणार असल्याचे यावेळी सूतोवाच करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ११ मधील नब्बू कुरेशी ते कोडापे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे नियोजन आहे.याकरिता येथील नगरसेवक थारांगणा खालीद पटेल यांच्या अथक परिश्रमाने या विकासाभिमुख सिमेंट रस्त्यांची सौंदर्यात भर पडून नागरिकांना समर्पित होणार आहे.
नगरोथ्यान महाभियांन योजना अंतर्गत निधीतून २८,१७ ,०५६ रु.च्या विकास कामाचे दि.१४ सप्टेंबर रोजी वर्षावास निमित्त बुद्ध विहारात असलेले भन्ते करुणा बोधी यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.एखाद्या धार्मिक गुरूच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पाडण्याचे औचित्य मारेगाव शहरात बहुदा पहिल्यांदाच झाल्याने सामाजिक व धार्मिक एकोप्याचा संदेश अधोरेखित झाला.
या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की , नगरसेवक थारांगणा खालीद पटेल , नगरसेवक जितेंद्र नगराळे , अभियंता निखिल चव्हाण , माजी नगरसेवक उदय रायपूरे , खालिद पटेल , सुनीता चिकाटे , बेबीताई चिकाटे , भैय्या शेख , पंडित शेंडे , कविता चिकाटे , आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.