Type Here to Get Search Results !

मारेगाव येथे जागृती विचार मंच ची स्थापना

मारेगाव येथे जागृती विचार मंच ची स्थापना

🔸अध्यक्षपदी जितेंद्र नगराळे , अँड.मेहमुद खान सचिव
मारेगाव : प्रतिनिधी
शहरात सांस्कृतिक,सामाजिक वैभव समृद्ध करण्यासाठी आणि मनमानी,अन्यायकारक प्रश्नांची सडेतोड उत्तरे देण्यासाठी आता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक एकत्र आले आहे. जनतेच्या हिताचे 'सोंग' घेऊन शहरात एका  संघटनेचा मनमानी कारभार सुरु आहे. स्वतःचे व्यापारिक हित साधणाऱ्या या उतावीळपणाला  शह देण्यासाठी मारेगाव येथे जागृती विचार मंचची स्थापना करण्यात आली.
स्थानिक जीत निवासी झालेल्या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षपदी जितेंद्र नगराळे यांची तर सचिव म्हणून अँड.मेहमुद खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
     
कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून आकाश बदकी , विशाल किन्हेकर , संतोष रोगे सहसचिव - चांद बहादे , कोषाध्यक्ष - करण किंगरे , संघटक - विप्लव ताकसांडे मार्गदर्शक - उदय रायपूरे , खालीद पटेल , राजू मोरे ,प्रशांत नांदे , अभय चौधरी , बदरुद्दीन सय्यद प्रसिद्धी प्रमुख - दीपक डोहणे , कैलास ठेंगणे , पंकज नेहारे तर इकबाल सैय्यद , प्रविण काळे , महेंद्र पुराडकर , लाभेश खाडे , विनीत जयस्वाल , जुनेद पटेल , शाहरुख शेख  यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies