मारेगाव तालुक्याला लंपी सदृश आजाराचा विळखा
🔸पशुसंवर्धन विभागाने वाढविला लसीकरणाचा वेग
🔸खातरजमा करण्यासाठी नमुने पाठविले प्रयोगशाळेत
मारेगाव : प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनावर संसर्गजन्य रोगाचा धसका घेतला असतांना मारेगाव तालुक्यात लंपी सदृश आजार पाय पसरत आहे.यावर अंकुश लावण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावत तालुक्यात लसीकरणाच्या मोहिमेला गती दिली आहे.
मारेगाव तालुक्यात लंपी सदृश आजार विळखा घालत असून या आजाराने पशुधन पालक पुरते चिंतेत अडकले आहे.
तालुक्यातील वेगाव , जळका , मार्डी विभाग , कुंभा सर्कल मधील गावात या आजाराने शिरकाव केला आहे.
लंपी सदृश आजाराने मारेगाव तालुक्यातील पशुधणावर आक्रस्ताळेपणा सुरू केला असून शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.
परिणामी , या आजाराचे काही गावातील पशुधनाचे नमुने घेण्यात आले आहे.हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त होताच लंपी आजार स्पष्ट होणार आहे.
लंपी सदृश हा संसर्गजन्य आजार असल्याने अनेक पशुधनास कवेत घेण्याची भिती शेतकरी वर्गात व्यक्त होते आहे.दरम्यान , पशुधन विभागाने पशुधनाच्या लसीकरणासाठी गती वाढविली आहे.प्रत्येक गावात जाऊन लसीकरणाची मोहीम फत्ते करण्यावर पशु संवर्धन विभागाचा भर आहे.त्यासाठी डॉ.व्ही.बी.गोंगसे सह मारेगाव विभागासाठी डॉ.आकाश राठोड , कुंभा - ए. जी.राजगडकर , बोटोणी-पूनम नागपुरे , मार्डी -सुबोध मिश्रा , पशु संवर्धन अधिकारी कार्यरत आहे.तर उद्या गुरुवार पासून वागदरा - पेंढरी भागात डॉ. मुनींद्र मुन हे लसीकरणाची मोहीम हाती घेणार आहे.