Type Here to Get Search Results !

मारेगावात अडीच लाखाचे सोने घेवून पोबारा

खळबळजनक...

मारेगावात अडीच लाखाचे सोने घेवून पोबारा

🔸मारेगाव प्रभाग क्रं.६ मधील घटना
🔸सोने चकाकून देण्याच्या नावाखाली केला हात साफ
🔸अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
मारेगाव : दीपक डोहणे
शहरातील प्रभाग ६ मधील सेवानिवृत्त असलेल्या घरात दोघे प्रवेश करतात..काकाजी तुमच्या घरातील सोने जुने आहेत...ते चकाकून देतोय ..या भाबड्या आशेवर विश्वास ठेवून हे तब्बल पाच तोळे सोने त्यांच्या हातात देतात..हे सोने कुकर मध्ये काही वेळ गरम करा असे सांगतात..त्यानुसार किचन मध्ये जातात..गरम करण्याची प्रक्रिया सुरू असते...हे दोन भामटे काकाजी साबण आणा हात धुण्याचा बहाणा करतात..शिताफीने हे सोने बदलत बनावट कुकर मध्ये टाकतात..आणि आम्ही काही वेळात येतोय
म्हणून बाहेर पडतात..वाजवी पेक्षा अधिकचा वेळ होऊनही ते दोघे आले नसल्याने काकाजी कुकर कडे जातात..आणि पाहताच सोनेच बनावट असल्याचे खातरजमा होताच काका थंडगार पडतात..आणि पोलीस ठाणे गाठतात.
      
हे एखाद्या चित्रपटातील कथानक नव्हे तर आज  सकाळी ११ वाजता मारेगाव शहरात घडलेले खळबळजनक वास्तव आहे.येथील शंकर गारघाटे सेवानिवृत्त असलेले यांच्या घरात दोन भामट्यांनी सोने चांदी चकाकून देण्याच्या नावाखाली घरात प्रवेश केला. सुरुवातीला चांदी स्वच्छ करण्यास दिले.एकदम चकाकी झाल्याचे पाहून सोने ही देण्याचा मोह आवरला नाही.यात त्यांनी चपलाकंठी , बांगडी व अंगठी हे जवळपास पाच तोळ्याचे सोने दोन भामटे असलेल्यांच्या हातात दिले. हे सोने कुकर मध्ये गरम करण्याचा सोज्वळ सल्ला दिला.त्यानुसार किचनमध्ये दोन भामटे , शंकरराव व त्यांची पत्नी गेले.शिताफीने कुकरमध्ये पावडर टाकीत खरे सोने लंपास करीत  बनावट सोने कुकरमध्ये टाकले.काही वेळातच गरम होईल हा बहाणा सांगत आम्ही बाहेरून येतोय म्हणून या भामट्यांनी पोबारा केला.आणि तब्बल अडीच लाखाचे सोने स्वच्छ करण्याच्या नावाखाली शंकरराव गारघाटे  यांची अलगद फसगत झाली.
     
दरम्यान ,  फसगत झाल्याचे समजताच वयोवृद्ध सेवानिवृत्त  
शंकरराव गारघाटे यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.त्यानुसार अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी भामट्यांनी वापरलेला पावडर जप्त केला.घटनेच्या वेळी सेवानिवृत्त असलेल्या गारघाटे यांचा मुलगा व सून हे ड्युटीवर गेले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies