Type Here to Get Search Results !

मारेगाव नगरी सर्वांग सुंदरसाठी मीही प्रयत्नशील...

मारेगाव नगरी सर्वांग सुंदरसाठी मी पण प्रयत्नशील...

🔸मा.संजय देरकर यांचे प्रतिपादन
🔸प्रभाग १७ मध्ये थाटात भूमिपूजन
मारेगाव : प्रतिनिधी
 शहरातील नागरिकांच्या अतूट सहकार्याने मूलभूत गरजेवर भर हा विकासाभिमुख कार्यक्रमाचा स्तुत्य उपक्रम आहे.शासनाच्या विविधांगी योजना कार्यान्वित करून शहर सर्वांग सुंदर करण्यासाठी मी तुमच्या सदैव पाठीशी आहे.सर्वांच्या सहकार्याने व एकदिलाने विकासाचा गाडा हाकण्याचे सत्कार्य करण्याची नामी संधी कृतीत उतरविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रसंगी  शहर सर्वांग सुंदर करण्यासाठी मी ही प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संजय देरकर यांनी केले.
     
ते मारेगाव प्रभाग क्रमांक १७ मधील विकासाभिमुख सोहळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित करणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर वाचनालयाचे नियोजित बांधकाम कार्यक्रमाचे भूमीपूजन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की , स्वीकृत नगरसेवक शंकरराव मडावी , नगरसेवक आकाश बदकी , राहुल राठोड ,माजी सैनिक अरुण गेडाम , इकबाल सय्यद ,  माजी नगरसेवक जिजाताई वरारकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
       
याप्रसंगी येथील प्रभागातील सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता व गट्टू बसविण्याच्या नियोजनाचेही भूमिपूजन करण्यात आले.
         
यावेळी प्रमुख अतिथींनी प्रभाग निहाय विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्यावर भर दिला.स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने विकासाचे पावले पुढेही सरकत राहील असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
      
प्रभागातील नगरसेवक जितेंद्र नगराळे यांच्या सुबक कल्पनेतून शानदार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नगरसेवक जितेंद्र नगराळे यांनी तर शंकरराव मडावी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies