संवेदना...
सेवा निवृत्त शिक्षिका कुसुम विठ्ठलराव गजभिये यांचे निधन
🔸नागपूर येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
🔸उद्या मंगळवारला मारेगाव येथे अंतिम संस्कार
मारेगाव : प्रतिनिधी
येथील सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव गजभिये यांच्या सुविज्ञ पत्नी कुसुमताई गजभिये ( ६५)यांचे आज सोमवारला अल्पशा आजाराने निधन झाले.
दोन दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थाने त्यांना वणी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.
नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची आज मंगळवार ला दुपारी एक वाजताचे सुमारास प्राणज्योत मालविली.दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन ब्रेन अटॅक आल्याचे सांगण्यात आले.
कुसुमताई विठ्ठलराव गजभिये या प्रशासकीय सेवेतील शिक्षिका पदाचा सकारात्मक काळ सांभाळत तालुक्यातील करणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतून सन २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यांच्या पश्चात पती विठ्ठलराव गजभिये , दोन मुले , दोन मुली , नातवंड असा आप्तपरीवार आहे.
उद्या मंगळवार सकाळी ११ वाजता स्थानिक स्मशानभूमीत यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबा कडून देण्यात आली.