ब्रेकींग...
अखेर दांडगाव येथील पोलीस पाटील निलंबित
🔸मारेगाव न्यायालयात खोटी साक्ष देणे भोवले
🔸उपविभागीय अधिकारी यांचा आदेश निर्गमित
मारेगाव : प्रतिनिधी
अभियोग पक्षाला सहकार्य करण्यात असमर्थता दर्शविल्याचा ठपका ठेवीत तालुक्यातील दांडगाव येथील पोलीस पाटील जागेश्वर विनायक चिंचोळकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील गौतम चांदेकर हे अवैध दारू विक्री करित असतांना पोलिसांनी रंगेहात पकडले होते.कारवाई नंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले.
शासन विरुद्ध चांदेकर यांच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणात येथील पोलीस पाटील यांनी न्यायालयात खोटी साक्ष दिली .अभियोग पक्षाला कोणतेही सहकार्य केले नसल्याचा ठपका चिंचोळकर यांचेवर ठेवण्यात आला.
याबाबतचा अहवाल न्यायाधीश निलेशजी वासाडे यांनी उपविभागीय अधिकारी , वणी यांचे कडे पाठविला.प्रकरणाची गंभीरता पाहून उपविभागीय दंडाधिकारी डॉ.शरद जावळे यांनी दांडगाव येथील पोलीस पाटील जागेश्वर विनायक चिंचोळकर यांना निलंबित केल्याचा आदेश आज दि.२९ सप्टेंबर रोजी निर्गमित केला .
दरम्यान , पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा गावपातळीवरील दुवा समजल्या जातो.मात्र शासन विरुद्ध चांदेकर यांचे प्रकरणात खोटी साक्ष देऊन निलंबन ओढावून घेतल्याने पोलीस पाटील वर्तुळात खळबळ उडाली आहे.