Type Here to Get Search Results !

डॉ. अजित फडके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

डॉ. अजित फडके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

🔸विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीतर्फे गौरव 
 🔸अस्थिरोग शल्यचिकित्सक म्हणून राज्यभर ख्याती
मारेगाव : यवतमाळ - प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातनाम अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून परिचित असलेले यवतमाळचे अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. अजित फडके यांना विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांना मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. डी. टन्ना यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
       

डॉ. अजित फडके यांची अस्थिरोग शल्यचिकित्सक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे. गेल्या चार दशकांपासून त्यांनी अनेक प्रकारच्या हाडांच्या कठीण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. पुण्यासारख्या महानगरातदेखील त्यांना कठीण शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आले आहे. अस्थिरोग शल्यचिकित्सेत ते पारंगत असून त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील ते ’दिग्गज’ म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीने त्यांना ’जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीची वार्षिक सभा नागपूर येथे शनिवारी (ता. 10) व रविवारी (ता. 12) पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मकरंद धोपावकर, सचिव डॉ. निनाद गोडघाटे, उपाध्यक्ष डॉ. सत्यजित जगताप तसेच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गडगोणे (चंद्रपूर) आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला विदर्भातील सुमारे साडेतीनशे अस्थिरोग तज्ज्ञांनी हजेरी लावली होती. नागपूर येथील ज्येष्ठ अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. सुधीर बाभूळकर, डॉ. सक्सेना, डॉ. गोल्हर आदींनी डॉ. फडके यांचे अभिनंदन केले.

सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर
डॉ. अजित फडके यांनी विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांमध्ये विविध जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. ते ’आयएमए’ यवतमाळचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटी व विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष होते. संजीवन सेवा व संशोधन संस्थेचे अध्यक्ष होते. तसेच ते रोटरीचेही सदस्य आहेत. नागपूर व यवतमाळ येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी चार पोलिओ शस्त्रक्रिया शिबिरे घेतली आहेत. आयकर विभागाने त्यांना 2001 मध्ये ’आयटी’ सन्मानाने गौरविले आहे. महात्मा गांधी मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सेवाग्राम (वर्धा) येथे दर शनिवारी ते ऑर्थोप्लास्टी सर्जरीसाठी जातात.
त्यांचे चिरंजीव अस्थीरोगतज्ञ डॉ. अक्षय फडके त्यांच्यासोबतच रुग्णांना सेवा देतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies