मारेगावात प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ गठीत
तालुका अध्यक्षपदी सचिन मेश्राम ; कैलास ठेंगणे सचिव
🔸जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहिर
🔸कार्याध्यक्षपदी दीपक डोहणे यांची निवड
मारेगाव तालुका प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी सचिन मेश्राम यांची तर सचिव म्हणून कैलास ठेंगणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
स्थानिक विश्राम गृहात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल राठोड , महिला जिल्हाध्यक्ष अर्चना भोपळे , मौनोद्दीन सौदागर , जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मारेगाव तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
कार्यकारिणीत मारेगाव तालुका कार्याध्यक्ष म्हणून दीपक डोहणे , जिल्हा उपाध्यक्ष अनंता गोवर्धन , तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे , सहसचिव - सुनील उताणे , संघटक- रवी घुमे , पंकज नेहारे , कैलास मेश्राम , कोषाध्यक्ष - जयप्रकाश वनकर , सुरज झोटींग , प्रसिध्दी प्रमुख - संतोष बहादूरे , रोहन आदेवार , विवेक तोडासे , राजू पिपराडे , सुदर्शन टेकाम यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान , कार्यकारिणी जाहीर होताच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकारिणीतील पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डोहणे तर आभार अनंता गोवर्धन यांनी मानले.