आत्महत्येची धग...
युवा शेतकऱ्याने घेतले शेतात विष
🔸पांढरकवडा (पिसगाव)येथील घटना
🔸चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू
🔸मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र कायम
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील युवा शेतकऱ्याने विषाचा घोट घेत उपचारादरम्यान त्याचा चंद्रपूर येथे मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.सातत्याने होत असलेल्या आत्महत्येचे सत्र अजूनही कायम आहे.
सुधीर रवी गोलर (२८) असे विष घेऊन जीवनयात्रा संपविलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.मागील महिन्यात सततच्या पावसाने शेतातील उभे लयास गेले.त्यामुळे सदर शेतकरी कमालीचा विवंचनेत होते.
दि.४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्याने वडगाव शिवारात असलेल्या शेतात विष प्राशन केले.लगतच्या शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.उपचारादरम्यान सुधीर याची आज मंगळवारला ११ वाजता प्राणज्योत मालविली. मृतकाच्या पश्चात आई व एक भाऊ आहे.