मांगली पुन्हा वादाच्या भोवऱ्यात...
अंगणवाडी सेविका, पुत्रासह ग्रा.पं. सदस्य व पत्नीवर अँट्रासिटीचा गुन्हा दाखल
🔸सेविकेने दिली उपसरपंच विरुद्ध तक्रार ; विनयभंगाचा गुन्हा दाखल
मारेगाव : प्रतिनिधी
ग्राम पातळीवर विकास कामे सुरू असतांना येथील अंगणवाडी सेविका व मुलगा आणि ग्रामपंचायत सदस्य आणि त्याच्या पत्नीने अडथळा निर्माण केला.अशातच घटनास्थळी उपसरपंच येताच त्यास जातीयवाद शिवीगाळ करून अपमानित केल्याने चौघा विरुध्द मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान उलटपक्षी सेविकेने उपसरपंच यांनी विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मारेगाव तालुक्यातील मांगली येथे घर तिथे नळ योजना या जल जीवन मिशन अंतर्गत विकास कामे सुरू असतांना कामे करण्यास मज्जाव करण्यात आला.त्यामुळे संबंधित अभियंता व कंत्राटदार यांनी उपसरपंच यांना घटनास्थळी पाचारण केले.उपसरपंच येताच गैरअर्जदार यांनी उपसरपंच दिलीप नानाजी आत्राम यांना जातीयवाद शिविगाळ करीत अपमानित केल्याची तक्रार दि.६ सप्टेंबर रोजी मारेगाव पोलिसात केली.त्यानुसार मांगली येथील अंगणवाडी सेविका रेखा गजानन कुत्तरमारे , मुलगा अखील गजानन कुत्तरमारे , ग्रामपंचायत सदस्य जीवन घुलाराम वानखडे व त्यांची पत्नी ललिता जीवन वानखडे यांचेवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कलम ३(१)आर,३ (१)एस , ३ (२)व्ही.ए,२९४,५०४,५०६,३४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिणामी , उपसरपंच घटनास्थळी येताच तो विळा घेऊन येत तुला बोलण्याचा अधिकार नसल्याचे बोलून शरीरावर हस्तक्षेप करीत विनयभंग केल्याची फिर्याद अंगणवाडी सेविकेने पोलिसात नोंदविली. त्यानुसार उपसरपंच दिलीप आत्राम यांचेवर कलम ३५४ , ३२३,५०४,५०६ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार , ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.
अंगणवाडी सेविकेची दुसऱ्यांदा तक्रार आणि पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात?
येथील बहुचर्चित अंगणवाडी सेविका या ना त्या कारणाने बहुदा चर्चेत असते.गतवर्षी पोषण आहार अपहार प्रकरणी अंगणवाडी सेविका रेखा कुत्तरमारे यांचे विरोधात पालकासह ग्रामस्थांनी संबंधित विभागात तक्रार दाखल केली होती.मात्र साटेलोट्याने या गंभीर प्रकरणाचे भिजत घोंगडे आहे.असा आरोप गावकरी करीत असतांना सेविका ह्या कायद्याच्या कचाट्यात पुन्हा पुरत्या अडकल्या.हे प्रकरण अंगावर शेकणार म्हणून स्वतः बचावासाठी येथील दोन युवका विरोधात विनयभंगाची तक्रार डिसेंबर २०२१ मध्ये दाखल केली होती. ग्रामस्थानीही सेविकेच्या बोथट कार्यप्रणाली विरोधात तक्रार दाखल केली होती.मात्र संबंधित विभाग पाठराखण करीत अभय देत असल्याने बहुचर्चित व वादग्रस्त सेविकेचे मनोबल उंचावण्याचा सोयीस्कर प्रयत्न चालविल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. तूर्तास प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.