खळबळजनक...
सिंधी (महागाव) शिवारात वाघाचे आढळले पगमार्क
🔸वाघाचा वाढला वावर
🔸शेतकऱ्यांमध्ये भीती
मारेगाव तालुक्यातील सिंधी (महागाव )शिवारात वाघाचे पगमार्क आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.
सिंधी (महागाव) शिवारातील विलास नेहारे नामक शेतकऱ्यांची ठेक्याचे शेत आहे . आज सकाळी सदर शेतकरी शेतात गेला असता त्याला पगमार्क आढळून आले. त्यामुळे सदर वार्ता गावात पसरतात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी सुद्धा तालुक्यात खैरगाव, वेगाव, बोटोनी सह इतर वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बोटोनी जंगलव्याप्त परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. मात्र अजून पर्यंतही सीसीटीव्ही कॅमेरा वाघ कैद झाला नाही ,हे विशेष. त्यामुळे सदर वाघाची पावले आता सिंधी (महागाव) कडे वळली नसावी ना? असा प्रश्न नागरिकाना पडत आहे. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने सदर भागाची पाहणी करून नागरिकांना सुरक्षा मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.