Type Here to Get Search Results !

मारेगाव औ. प्र.संस्थेत दीक्षांत समारोह

मारेगाव औ. प्र.संस्थेत दीक्षांत समारोह

🔸विश्वकर्मा जयंतीचे औचित्य
🔸मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
मारेगाव : प्रतिनिधी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव  येथे विश्वकर्मा जयंती निमित्त दीक्षांत समारोह दिनांक १७ सप्टेंबर रोजी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनीष मस्की नगराध्यक्ष न. प. मारेगाव व प्रमुख अतिथी म्हणून आय. एम. सी. ऑफ आय टी आय मारेगाव चे उपाध्यक्ष श्री सुभाष मत्ते ,  संस्थेचे प्राचार्य श्री. एस. डी. राहटे  यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी पालकवर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थिती होते. 
        
शा.औ. प्र. संस्था मारेगाव येथील विजतंत्री या व्यवसायचा विद्यार्थी ऋषिकेश बाळू विरुटकर हा महाराष्ट्रातून 16 वा मेरिट व संस्थेतून प्रथम आला असून त्याचा गौरव नगराध्यक्ष मनीष मस्की यांच्या हस्ते करण्यात आला व संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातून द्वितीय सागर बंडू पिपराडे आणि तृतीय कोपा या व्यवसायाची सना ईलीआना शेख ही आली.  त्यांच्या व सर्व व्यवसायाचे प्रथम द्वितीय तृतीय प्रशिक्षणार्थी यांचा गौरव व पदवीदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
       
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पूजा आकाश मडावी यांनी व आभार प्रदर्शन श्री पी.व्ही.मिलमिले यांनी मानले. 
      
सदर कार्यक्रमाला सर्व शिल्पनिदेशक व विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies