कुंभा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
मारेगाव:- प्रतिनिधी
कुंभा-येथीलभारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्याकरिता कायदेविषयक मार्गदर्शन व प्रबोधन शिबिर घेण्यात आले.यात विविध कायद्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य संजय देवाळकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मारेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयचे न्यायाधिश मा. निलेश वासाडे , एड मेहमूद पठाण, एड.रामटेके, सकाळचे बातमीदार कैलास ठेंगणे , एड. मेघा कोडापे, एड. मृणाली गाणार मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी न्यायाधीश निलेश वासाडे यानी मोटार ॲक्ट सह ॲट्रॉसिटी ॲक्ट, पोस्को कायद्याचे तर एड.मेहमूद पठाण यांनी न्यायलयीन कामकाजा कसे चालते तर, एड. प्रयाग रामटेके यांनी ज्येष्ठ नागरिकाचे हक्क व कायदा तर एड .मेघा कोडापे यांनी सायबर ग्रामीण क्राईम बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी न्यायधीश ह्यांनी परिसरातील प्रसिद्ध स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय भेट दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शेखर सोयाम यांनी केले.सूत्रसंचालन अशोक फुलमाळी ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज ठेपाले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृपाल खचकड, अरविंद खोके, प्रशांत तांमगाडगे, प्रवीण बारशेट्टीवार, प्रकाश खुटेमाटे, विलास बर्डे सह शाळेचे कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.