जीवनाची कनेक्टीव्हिटी टिकवण्यासाठी महापुरुषाच्या विचाराचे रिचार्ज करा
🔸जय शिवाजी दुर्गोत्सव कार्यक्रमात उदयपाल यांचे प्रतिपादन
मारेगाव:- प्रतिनिधी
ज्या नवदुर्गाचे समाजात सन्मानपुर्वक नवदिवस प्रतिस्थापना होते त्या दुर्गा म्हणजे सिंधु संस्कृती मधिल लढवय्या रणरागिनी होत्या त्यांच्या कर्तृत्वाचा जागर म्हणजे नवरात्र उत्सव होय, आज जर जिवनाची कनेक्टिव्हिटी साबुत ठेवण्यासाठी दुर्गा , अंबा, रेणुका या रणरागिणी सोबत महापुरुषाच्या विचाराचे रिचार्ज मारणे गरजेचे असल्याच प्रतिपादन सत्यपाल महाराज यांचे अनुयायी इंजि. उदयपाल महाराज यांनी मारेगांव येथे जय शिवाजी दुर्गोत्सव सार्वजनिक मंडळांच्या आयोजीत कार्यक्रमात केले.
मारेगाव येथील प्रभाग क्र १ मधिल जय शिवाजी सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने राष्ट्रीय प्रबोधनकार इंजि . उदयपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला, सप्तखंजेरी वादक उदयपाल महाराज यांनी समाजातील अनिष्ट प्रथावर कडाडून वार करित, कुटूंबातील होणाऱ्या कलहाला कसे मिटवता येईल यावर मनोरंजक शैलीतून प्रबोधन केले, मंडळाच्या सभासदानी कार्यक्रम आयोजीत करून समाज प्रबोधन कार्यक्रमातून समाजाला आनंदी जगण्याचा मंत्र देण्याचा उपक्रम दुर्गोत्सव मडळाच्या वतीने होत असून , सप्त खजेरी वादक उदयपाल महाराज यांचे संचातील साथसंगत तबला वादक रोशन चांदेकर ऑर्गन वादक प्रशांत ठाकूर गायक दिनेश लेनगुरे अक्षय वैद्य गौरव ढवस संजय मेश्राम सहकारी कार्तिक येरने यांच्या साथीने कार्यक्रमाची रंगत वाढली, संपूर्ण कार्यक्रम भरगच्च रसिकांच्या उपस्थितीत पार पडला.