मारेगावात मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात
🔸शहरातून निघाला जुलुस
🔸राजू उंबरकर यांची शुभेच्छापर भेट
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव येथे मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहराच्या प्रमुख रस्त्याने जुलूस काढीत स्थानिक मस्जिद जवळ सांगता करण्यात आली.यावेळी रॅली वरील समुदायावर पुष्पवर्षाव करण्यात आला.
या ईद निमित्त कब्रस्तान येथे निःशुल्क सेवा करणारे,हज करणारे आणि गौसिया मस्जिद चे इमाम व मोअज्जन यांचा शाल पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे,तालुका अध्यक्ष अविनाश लाबंट, शहर अध्यक्ष शेख नबी सह लाभेश खाडे, चांद बहादे, गजानन चंदनखेडे,जम्मू सैय्यद, आकाश खामनकर यांनी ईद निमित्त मुस्लीम समुदायांची गळा भेट घेत शुभेच्छा प्रदान केल्या.यावेळी प्रा.सतीश पांडे सह सर्वधर्म समभाव व्यक्त करणाऱ्या नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.