पक्षप्रवेश...
मारेगाव तालुक्यात 'मनसे' कडे इनकमीन
🔸राजू उंबरकर , संतोष रोगे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
आगामी काळात प्रस्थापितांना हादरा देऊन परिवर्तन घडविण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रात कमालीचा बदल उंबरठ्यावर आहे.त्याचाच एक भाग म्हणून कार्यकर्त्यांचा लोंढा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे परिवर्तित होत आहे.मारेगाव तालुक्यात दि.१० ला शेकडो युवा कार्यकर्ते इंजिन वर बसून राजू उंबरकर , संतोष रोगे , अविनाश लांबट यांच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहोर लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन राज्य उपाधक्ष मा. राजु उंबरकर व जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या प्रमुख उपस्थितीत मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी गोंडबुरांडा येथे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते दोन शाखा फलकाचे उ्दघाटन करण्यात आले .
यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष लाभेष खाडे , उप तालुका अध्यक्ष वामन चटकी , विभागीय अध्यक्ष प्रवीण नान्हे , वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे, सर्कल अध्यक्ष गणेश खुसपूरे, प्रशांत चौधरी, वसंता घोटेकर, यांचे सह मनसे पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
गोंड बुरांडा येथील अनिल पारखी , प्रेमानंद दानखेडे , उप सरपंच विजेय राजूरकर, विजय दानखेडे , शंकर खोके, पंकज गमे, शेखर अंड्रस्कर, नरेश बोंद्रे, यांच्या सह शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला.
मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चेबांधणीला कमालीचा वेग आला असून स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांचा लोंढा मनसे कडे वळत आहे. आगामी काळात तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते प्रस्थापितांना जबर धक्का देण्यासाठी मनसे च्या वाटेवर आहे.