धक्कादायक...
झिंगलेल्या इसमाचा पुलात पडून मृत्यू
🔸गौराळा शिवारातील घटना
🔸मृतक कोलगाव येथील रहिवासी
मारेगाव : प्रतिनिधी
मदिरा सेवनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असतांना झिंगलेल्या अवस्थेत थेट पुलावर लघुशंकेला गेलेल्या इसमाचा तोल जावून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला सकाळी उघडकीस आली.
प्रमोद माणिकराव गौरकार (४५) रा.कोलगाव ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे.
ते गौराळा शिवारात राज्य महामार्गावरील पुलावर लघुशंकेला थांबला.मंदिरेच्या सेवनाने झिंगलेल्या अवस्थेत पुलावरून त्याचा तोल जाऊन गतप्राण झाला.
सदरील घटना बुधवारच्या रात्री घडल्याचा कयास व्यक्त होत आहे.दरम्यान प्रमोद यांची मोटारसायकल पुलाच्या शेजारी असतांना त्यांचा मृतदेह पुलाखाली आज सकाळी निदर्शनास आला. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.