कुंभा येथे वाचन प्रेरणा दीन
कुंभा:- प्रतिनिधी
येथील भारत विद्या मंदिर मध्ये भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा अविस्मरणीय प्रवास करणाऱ्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विद्यालयाचे परीक्षक शेखर सोयाम तर प्रमुख पाहुणे बी.डी कनाके , विद्यार्थी प्रतिनिधी कु. ऋतुजा धाबेकर मंचावर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांकरिता रीडिंग मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे संचालन ए.के खचकड तर प्रास्ताविक ए.सी फुलमाळी यांनी केले. तर आभार प्रदर्शन धनराज ठेपाल यांनी मानले.