Type Here to Get Search Results !

खुराणा यांना अटक करा अन्यथा उपोषण

खुराणा यांना अटक करा अन्यथा उपोषण

🔸अखेर रायपूरे दाम्पत्यांनी थोपटले दंड
🔸पोलीस प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर उठविले प्रश्नचिन्ह
🔸आरोपीचा पोलीस ठाण्यासमोर मुक्त संचार
🔸पत्रकार परिषदेत केला आरोप
मारेगाव : प्रतिनिधी
येथील संशयित गौरीशंकर खुराणा हा आमच्या कुटुंबातील सदस्यांना जीवघेण्या धमक्या देत असून पोलीस त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊनही त्याची पाठराखण करीत असल्याचे रायपूरे दाम्पत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
    
वणी येथील  व्यापारी गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा हा मारेगावात एका संघटनेच्या नावाने धुडगुस घालीत आहे. या शहरातील लोकांना धाक दाखवित आहे.प्रशासन मधील अधिकाऱ्यांवर देखील दवाब टाकणे त्याचा धंदा झाला आहे,यासाठी चार दोन स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते घेऊन त्याने "जनते च्या हिताचे सोंग" उभे केले आहे.करणवाडी च्या एका शेतातील नाहक प्रकरण उभे करून त्याने  सौ पूनम अजय रायपूरे यांना जातिवाचक शिविगाळ केली. यावरून पोलिसांनी  संशयित आरोपी गौरीशंकर खुराणा याचेवर गुन्हा दाखल केला मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही.पोलिसांची ही संशयास्पद भूमिका असल्याचे रायपूरे दाम्पत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

करणवाडी शिवारात असलेल्या शेतात नाग मंदिराचे बांधकाम परवानगी च्या कारणास्तव खोट्या गुन्ह्यात आम्हाला अडकविल्याचा आरोप रायपूरे कुटुंबीयांनी केला असून  याबाबत आम्ही पोलिसात  फेब्रुवारी २०२० ला  स्वतः तक्रार केली मात्र ठाणेदार आता ती तक्रारच पोलिस रेकार्ड मध्ये उपलब्ध नसल्याची बतावणी करून खुराणा याची पाठराखण करत आहे असा त्यांनी यावेळी आरोप केला.
    
दरम्यान , अजय रायपूरे यांनी आजतागायत तीन तक्रारी तर पूनम रायपूरे यांनी चार वेळा तक्रारी दाखल केल्या मात्र पोलीस प्रशासन केवळ वेळकाढू धोरण अवलंबित असून आमची बोळवण करीत असल्याचाही आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला.यासंदर्भात  बयाण साठी पोलिस मला  बोलावून दिवसभर ताटकळत ठेवत असे, एखाद्या महिलेसोबत हा किळसवाणा प्रकार कायदा व सुव्यवस्थेची वल्गना करणाऱ्या पोलीस प्रशासनास अशोभनीय असल्याचा सूतोवाच  करण्यात आला.
      
त्यामुळे आता पुरे झाले म्हणत रायपूरे दाम्पत्यांनी पूर्ण ताकदीने दंड थोपटले असून अनुसूचित जाती / जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या संशायित आरोपी गौरीशंकर खुराणा ह्याला तात्काळ अटक  करा अन्यथा कायद्याचे थोतांड मांडणाऱ्या अन  पारदर्शकतेची पुंगी  वाजविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी खुर्ची रिकामी करावी.नाहीतर आम्ही आता आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असा गर्भित इशारा रायपूरे दाम्पत्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.

फिर्यादीची सरकारी जबाब झालेला आहे.मला जेव्हा आवश्यकता वाटल्यास तेव्हा संशायितास अटक करु
संजय पूज्जलवार
उपविभागीय पोलीस अधिकारी
वणी

संबंधित प्रकरणाचा तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे आहे.गांभीर्याने तपास सुरू आहे.संशायिता विरोधात पुरावा मिळाल्यास तात्काळ अटकेची कारवाई करू.
राजेश पुरी
ठाणेदार , पो.स्टे. मारेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies