वेगाव येथे माता व घर सुरक्षित कार्यक्रमाला प्रतिसाद
वेगाव : राजू पिपराडे
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला.
वेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात माता सुरक्षित असेल तर घर कसे सुरक्षित राहतील यावर प्रमुख पाहुण्यांनी विचार मांडले.
स्वतःची काळजी घेत कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करून खऱ्या अर्थाने माता कशी सुरक्षित राहील यावर भर देण्यात आला.त्यामुळे घर हे आनंदात राहील पर्यायाने कुटूंबातील सर्वच आरोग्य बाबतीत सकारात्मक राहील असा आशावाद जनजागृती कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच मालाताई गौरकार , आरोग्य अधिकारी शिंदे , उपसरपंच , सदस्य , आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , रोजगार सेवकासह गावातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.