आर्थिक मदत द्या अन्यथा रस्त्यावर....!
🔸मारेगाव तालुका राष्ट्रवादी पार्टीचा प्रशासनास सज्जड दम
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यात झालेल्या पर्जन्य वृष्टीने शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले तर जमिनी खरडून गेल्यात. याचा मोबदला म्हणून शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा हवेत विरत असतांना त्या येत्या दहा दिवसात प्रदान करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने प्रशासनास दिला आहे.
यंदा पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर जमीन खरडून उभे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आला आहे.
शासनाने घोषित केलेली मदत अजुनही हवेत विरत असल्याने शेतकऱ्याच्या आशेचा किरण मावळत आहे.त्यामुळे अतिवृष्ठिची तात्काळ मदत करा अन्यथा मारेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून दिला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष भारत मत्ते , राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे , दयाल रोगे , नितीन गोडे , हेमंत नरांजे , मुन्ना शेख आदींची उपस्थिती होती.