आत्महत्येची धग...
बोटोणी येथील युवकाने घेतला गळफास
🔸राहत्या घरी केला जीवनाचा अखेर
🔸बोटोणीत शोककळा
मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील २८ वर्षीय युवकाने स्वगृही गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शनिवार रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
सुशांत दिलीप वासेकर असे जीवनयात्रा संपविलेल्या युवकाचे नाव आहे.
तो मारेगाव तालुक्यातील वेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत परिचारिका श्रीमती अनुसया परचाके (वासेकर)यांचा एकुलता एक चिरंजीव होता.घटनेच्या वेळेत आई ही कर्तव्यावर होत्या तर आजी ही आठवडी बाजारासाठी करंजी येथे गेल्या असतांना एकांताची संधी साधून सुशांत याने स्वगृही गळफास घेतला.
मृतक सुशांत यांचे आठ वर्षापूर्वीच पितृछत्र हरविले होते.थोरली बहीण ही रशीया येथे एम.बी.बी.एस.च्या पदवीला आहे.
परिणामी , सुशांतने नेमकी आत्महत्या का केली याबाबतचे कारण तूर्तास अस्पष्ट आहे.सर्वत्र दिवाळीचा सण साजरा करीत असतांना या घटनेने बोटोणी येथे पुरती शोककळा पसरली आहे.