आत्महत्येची धग...
मारेगाव तालुक्यात पुन्हा अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
🔸मारेगाव तालुक्याला "आत्महत्येचे ग्रहण"
🔸अतिवृष्टी व आर्थिक विवंचना असलेल्या शेतकऱ्याने घेतले विष
🔸म्हैसदोडका पाठोपाठ चोपण येथील घटनेने तालुका हादरला
ऐन दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असतांना भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला म्हैसदोडका येथील सालदाराने तर चोपण येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांने विष प्राशन करून जीवनाचा अखेर केला.सर्वत्र दीपोत्सव सुरू असतांना मारेगाव तालुक्याला ऐन सणासुदीला आत्महत्येचे ग्रहण लागल्याने तालुका पुरता हादरला आहे.
सचिन विठ्ठल ढोरे (३७)रा.चोपण असे अल्पभूधारक शेतकऱ्याने विष घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना रात्री ११.३०वाजता उघडकीस आली.
सचिन यांचेकडे पाच एकर पेक्षा कमी शेती आहे.यावरच कुटुंबाचा गाडा हाकत असतांना अतिवृष्ठीने उभी पिके मातीमोल केली.ही विवंचना त्याला अस्वस्थ करीत असतांना शासनाची मदतीची घोषणाही दिवाळी सारख्या सणात पदरी पडली नसल्याने शासनाने ठरविलेली विहीत वेळेतील मदत हवेत विरली.त्यामुळे दिवाळी सारखा सण अंधकारमय त्याच्या वाट्याला आला.आगामी काळातही जीवन कसे कंठावे या चिंतेत सचिनने गावालगत असलेल्या जंगलात जाऊन विष ग्रहण केले.
रात्री उशिरा पर्यंत घरी आला नसल्याने गावकऱ्यांनी सर्वत्र शोधाशोध घेतली असता जंगलात विष प्राशन करून सचिनचा मृतदेह निदर्शनास आला.
दरम्यान , मृतकाच्या पश्चात आई , वडील , पत्नी , एक मुलगा , एक मुलगी असा आप्तपरीवार आहे.
ऐन दिवाळीत दोन आत्महत्यांनी मारेगाव तालुका प्रचंड हादरला असून म्हैसदोडका व चोपण येथील घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.