Type Here to Get Search Results !

सहकार क्षेत्रातील दिपस्तंभ अँड. देविदासजी काळे

सहकार क्षेत्रातील दिपस्तंभ अँड. देविदासजी काळे


जे काही रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा

ही ओवी मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा कष्टकरी जनतेचा कैवारी शेतमजूर असंघटित कामगारांसाठी संघर्ष करणारा एक बुलंद आवाज श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा आधारवड ऺकांग्रेस चा सच्चा पाईक सर्व सारा समाजाच्या उन्नतीसाठी झूंजणारे अँड देविदास काळे यांचे व्यक्तीमत्व माझ्या समोर उभे राहते.अड देविदास काळे हे 20आक्टो 2022 ला वयाची सत्तर वर्षे पूर्ण करून एक्काहत्तराव्या वर्षात  पदार्पण करत आहे.त्या निमित्ताने थोडेसे.

अँड देविदास काळे यांचा जन्म मेंढोली  ता वणी येथे शेतकरी कुटुंबात झाला.खेड्यातील शेतमजूराचे दुःख ते लहानपणापासून च पाहत आहे.बिए एल एल बी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाया बरोबरच समाज सेवेस प्रारंभ केला.
कष्टकरी कामगार जनतेचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.1999पर्यंत ते कम्यूनिस्ट पक्षात कार्यरत होते.या कालावधी त त्यांनी दोनदा 1990व1995ला  वणी विधानसभेची निवडणूक त्यांनी कम्यूनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून लढवली.या निवडणूकीत ते जरी  पराभूत झाले होते.. तरी त्यांना या निवडणुकीत जनसामान्यांना भेटण्याचा नवा अनुभव आला.जनसेवा अधिक जोमाने करण्यासाठी 2000ला कांग्रेस पक्षात प्रवेश केला.गेल्या 22वर्षा पासून ते कांग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून एकनिष्ठतेने कार्यरत आहे.सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष आहे.

1989 सारी वणी येथे स्थापन झालेल्या श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या   स्थापनेपासून संचालक पदावर कार्यरत आहे.2001पासून आजतागायत पर्यंत अखंडपणे पतसंस्थेचे अध्यक्ष पद समर्थ पणे सांभाळत आहे. जून 2022मध्ये संपन्न झाले ल्या रंगनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत ही त्यांनी दैदिप्यमान यश मिळविले.व2022-27या कालावधी साठी त्यांची अध्यक्षपदी फेर निवड झाली.सहकार क्षेञातिल पतसंस्थेत सलग 22 वर्षे अध्यक्ष पदी अखंडपणे कार्य रत राहने ही साधी व सोपी गोष्ट नाही.खरच ते सहकारातील दिपस्तंभ॒ आहे.त्यांच्या या कार्यकर्तूत्वामूळेच/नवराष्ट् वृत्त पञ समूहाने//कठोर परिश्रम करून यश संपादन करणा॒रया   व्यक्तीचा गौरवशाली व्यक्तीमध्ये निवड करून/मराठी अस्मिता पूरस्कार/देऊन गौरविण्यात आले आहे.
अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.वसंत जिनींग वणी चे ते मागिल दहा वर्षांपासून अध्यक्ष आहे.राष्टिय मजदूर कांग्रेस इंटक चे ते यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आहे.त्यांच्या मोलाच्या सहभागा मूळे या भागातील सामाजिक सांस्कृतिक व सहकारीता चळवळ अधिक गतिमान होत आहे.

कोणत्याही कामात स्वताला झोकून देणे हा त्यांचा स्थायी भाव आहे.लोकसभेच्या /विधानसभेची निवडणूक वइतरञ कोणत्याही निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते जोरकसपणे प्रयत्न करतात.पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते पायाला भिंगरी बांधल्या सारखे भ्रमंती करतात.खेडोपाडी/वाडी वस्तीत/पाड्यावर कांग्रेस चा विचार पोहचवितात.कांग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात.कोणत्याही पक्षाचे संघटन हे नंदादीपासारख्या अखंड जळत असणा॒रया नेत्यावर अवलंबून असते.या विभागातील गावखेड्यात वाडी वस्तीत/शहरात कांग्रेस चे संघटन हे अँड देविदास काळे सारख्या लढवय्या नेत्यामूळेच टिकून आहे.हे निर्विवाद सत्य आहे.

संस्थेच्या पदाने येणारे मोठेपण त्यांच्या जवळ नाही.श्रीमंतीने आलेल मोठेपण त्यांच्या जवळ नाही.त्यांचमोठेपण दुःखी//कष्टी/श्रमीक/निराधार या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी जोपासलेल्या जाणीवेने मध्ये मला दिसते.त्यांनी आयूष्यभर माणसं जोडली.उपेक्षित दुर्लक्षित माणसाशी जूळलेली नाळ कधी तूटू दिली नाही.त्यांच जीवनच सामान्यांच्या उत्थानासाठी समर्पित आहे.अड देविदास काळे हे संघर्षातून पुढे आलेल व्यक्तीमत्व आहे.चळवळीतून पुढे आलेल नेतृत्व आहे.उर्दू कवी बिस्मिल सईदी यांच्या कवितेतील काही ओळी त्यांच्या आयुष्याला लागू पडतात.

जिन्हे दुनिया बनाती है
मकाम उनका नही बनता
जमाना उनका  है
जो खूद बनाते  है
मकाम अपना

रंगनाथ पतसंस्थेचे आधारवड/महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष/सहकारातील दिपस्तंभ॒/समाजहितैषी व्यक्तीमत्व असणारे/सेवावृत्ती वृत्ती  जोपसणारे अँड देविदास काळे यांचा 20आक्टो 2022 ला एकाहत्तरावा वाढदिवस.त्यांना निरोगी/निरामय/शतायुषी आरोग्य लाभो या कामनेसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ऊत्तम गेडाम
रवी नगर वणी
जिल्हा.यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies