धक्कादायक...
झुणका भाकर खातांना माजी उपसरपंच यांचा मृत्यू
🔸वेगाव येथील भास्कर वेले यांनी सोडला घटनास्थळी प्राण
🔸मारेगाव येथील घटना , वेगवेगळ्या तर्काला उधाण
मारेगाव : प्रतिनिधी
अलीकडच्या धकाधकीच्या काळात व हायटेक जमान्यात मृत्यू आता जवळ येऊ लागल्याने अनेक उदाहरणे आहेत.असाच एक धक्कादायक प्रकार मारेगाव शहरात घडला.झुणका भाकर ग्रहण करतांना वेगाव येथील ६० वर्षीय इसमाचा झुणका भाकर केंद्रातच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार ला दुपारी तीन वाजताचे सुमारास घडली.
भास्कर दौलत वेले रा.वेगाव असे झुणका भाकर खातांना मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
मारेगाव हे तालुका स्थळ असल्याने ग्रामीण भागातील मानवी जथ्था मोठया प्रमाणात शासकीय / निमशासकीय कामांकरिता दाखल होतात.अशातच दुपारची पोटाची न्याहारी म्हणून अत्यल्प दरात असलेल्या झुणका भाकरीवर तावही मारतात.
आज दुपारी तीन वाजताचे सुमारास वेगाव येथील भास्करराव वेले हे मारेगाव येथील एका झुणका भाकर केंद्रात गेले.भाकरीचा आस्वाद घेत असतांना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि काही कळण्यापूर्वीच त्यांनी मृत्यूला जवळ केल्याची घटना वेगवेगळ्या चर्चेला उधाण देऊन गेली.
दरम्यान , त्यांचा मृतदेह ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला असून नेमका मृत्यू कशाने झाला ? याबाबत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यागत वेगवेगळ्या तर्काला फुलस्टॉप मिळणार आहे.परिणामी भास्कर वेले हे वेगाव येथील माजी उपसरपंच होते.