आत्महत्येची धग...
पुन्हा अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतले 'मोनोसिल' विष
🔸वाटेतच सोडला प्राण
🔸चिंचाळा येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात आत्महत्येचे सत्र कायम असतांना आज रविवारला सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान चिंचाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मोनोसिल नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना उजेडात आली.या घटनेने चिंचाळा येथे शोककळा पसरली आहे.
पंढरी गोविंदा नैताम ( ५२) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.चिंचाळा शिवारात त्यांचेकडे केवळ दोन एकर शेती असून यात कपाशीची टोबणी केली होती.यंदाच्या अतिवृष्ठीने हातचे पीक मातीमोल झाले.त्यातच खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत पंढरी अस्वस्थ असायचा.
आज रविवारला नेहमी प्रमाणे शेतात गेला आणि मोनोसिल नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन केले.रस्त्यालगत असलेल्या शेतातील ही बाब येजा करणाऱ्यांच्या लक्षात येताच मारेगाव ग्रामिण रुग्णालयात हलविले मात्र पंढरी नैताम यांची वाटेतच प्राणज्योत मालविली.
मृतक शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी आहे.मारेगाव तालुक्यातील वाढत्या आत्महत्येची दखल शासन दरबारी घेतल्या जाईल का ? हा खरा प्रश्न मारेगाव करांच्या चिंतेत भर टाकत आहे किंबहुना मारेगाव तालुका सलग आत्महत्येने प्रभावित होत आहे.