वणी:- प्रतिनिधी
जगातील लोकांच्या हक्कासाठी आवाज उचलने हेच वृतपत्राचे काम असून पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे असे उदगार साप्ताहिक राळेगाव समाचारच्या दीपोत्सव दिवाळी अंकाचे उद्घाटक म्हणून उदघाटन करित असतांना प्रगतशील साहित्य व विचारवंत मा. गीत घोष यांनी काढले
ते साप्ताहिक राळेगांव समाचार दिपअंक प्रकाशन सोहळ्याचे उदघाटक म्हणून बोलत होते.
साप्ताहिक राळेगांव समाचार कार्यालय, इंदिरा नगर तहसील समोर, राळेगांव पारपडलेल्या यार सोहळ्याचे अध्यक्ष मा.ना. माजी शिक्षणमंत्री म.राज्य वसंतरावजी पुरके साहेब होते ,उदघाटक मा.गीत घोष हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा.आशिष कांबळे अमरावती हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.रविंद्र शेराम, नगराध्यक्ष न.पंचायत, राळेगांव, श्रीमत उषाताई भोयर जि.प.सदस्या, यवतमाळ, मा.चित्तरंजन कोल्हे ता.अध्यक्ष पा.ज.पा.तथा जि.प. सदस्य, मा.प्रशांत तायडे, सभापती पंचायत समिती, राळेगांव,
मा.अरविंद वाढोणकर,जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल जिल्हा कांग्रेस कमिटी, यवतमाळ, मा.जानराव गीरी, उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगांव, मा.अड.प्रफुल चौहान, जिल्हा महामंत्री भाजपा, यवतमाळ, मा.अड. फिडेल बायदाणी, जेष्ठ विधिज्ञ, राळेगांव, मा. अरविंद फुटाणे, ता.अध्यक्ष भाराका,राळेगांव, मा.शंकर वरघट, जिल्हा उपाध्यक्ष मनसे, यवतमाळ, मा.विनोद काकडे, तालुका प्रमुख शिवसेना, राळेगांव, मा. राजेश काळे,तालुका अध्यक्ष पत्रकार संघटना, राळेगांव, मा.नंदकुमार गांधी, सभापती, वसंत जिनिंग, राळेगांव, मा.मिलींद इंगोले, अध्यक्ष खरेदी विक्री संघ, राळेगांव, मा.सचिन हुरकुंडे, अध्यक्ष ग्रामविकास सोसायटी, राळेगांव, मा. कुदनभाऊ कांबळे,
गरसेवक, नगर पंचायत, राळेगांव, सौ.कमरूनिस्सा हमिदभाई पठाण, नगरसेविका नगर पंचायत,राळेगांव, सौ.पुष्पाताई विजय कन्नाके, नगरसेविका, नगर पंचायत, राळेगांव ह्या उपस्थित होत्या.
पुढे बोलताना घोष म्हणाले की, हा आहे रे आणि नाही रे या दोन विचालधारेतील संघर्ष असून तो संघर्ष कमी होण्याऐवजी अधिक तिव्र होतांना दिसते आहे. लोकांचे संविधानिक हक्क सोडवण्याऐवजी कुंठित केले जात आहे, लोकांचा आवाज दाबल्या जात आहे. लोकांच्या बाजूने आवज उठवणाऱ्या पत्रकार विचारवंतांना जेल मध्ये डांबले जात असूश देशातील सत्ता तानाशाहीचे रुप धारण करुन देशातील कष्टकरी, शेतकरी व नागरिकांना देशोधडीला लावत आहे आणि वृतपत्राने राजकीय स्वरुप धारण करुन लोकांच्या बाजूने बोलने, लिहणे बंद केले आहे
त्यामुळे आपल्या देशाची आज ही अवस्था आहे.या अवस्थेतून बाहेर पडाये असेल तर वृतपत्र आणि पत्रकारांनी निर्भिडपणे लोकांच्या बाजूने लिहायला लागले पाहिजे आणि लोकांनी देखील आम्ही भारताते नागरिक म्हणून सत्तेला प्रश्न विचारायला रस्त्यावर उतरले पाहिजे कारण ज्या देशातील जनता मुखी तो देश भांडवलशाहीच्या पारतंत्र्यात जगावे लागते,असेही ते म्हणाले. प्रमुख वक्ते प्रा.आशिष कांबळे यांनी देखील आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून ह्या व्यवस्थेचा खरपून समाचार घेत पत्रकारांनी लोकांच्या हक्कासाठी लढले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.
या प्रसंगी मा.वनीश घोसले, सरपंच ग्रामपंचायत पळसकुंड,मा. विजय धानोरकर, उपसरपंच, गट ग्रामपंचायत वाटखेड यांचा सत्कार घेण्यात आला.
या सोहळ्याचे प्रास्ताविक मा.फिरोज लाखाणी संपादक साप्ताहिक राळेगांव समाचार यांनी केले तर
संचालन- मझीनी बायदाणी यांनी केले
हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी समीर लाखाणी, शकील लाखाणी आणि साप्ताहिक राळेगांव समाचार परिवारातील, वितरक,वार्ता हर यांनी परिश्रम घेतले.