शेतातून सौरऊर्जा व प्लेटा लंपास
🔸मारेगाव तालुक्यात भुरटे चोर सक्रिय
🔸वेगाव येथील घटनेत शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान
🔸वेगाव येथील घटनेत शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान
शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकटासह आता चोरटेही शेतशिवारातील शेतीपयोगी साहित्याच्या रडारवर असल्याचे चित्र आहे.वेगाव येथील शेतातून तब्बल चाळीस हजार रुपयांच्या सौरऊर्जा व प्लेटा चोरून नेल्याची घटना ०३ आँक्टोबर रोजी उघडकीस आली.पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरटे पकडण्याचे कडवे आव्हान पोलिसांसमोर उभे व कायम ठाकून आहे.
तालुक्यातील वेगाव येथील चेतन सुभाष टोंगे यांचे शेत गोधणी शिवारात असून शेत वहिती आणि शेतमालाच्या सुरक्षेकरिता सौरऊर्जा बॅटरी व प्लेटा शेतातील शेड मध्ये असतांना अज्ञात चोरट्यांनी यावर हात साफ केला.
दरम्यान , चाळीस हजार रुपये किमतीचे सामान चोरीला गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.परिणामी वाढत्या चोरीच्या घटनांत पोलिसांना चोरटे पकडण्यात अपयश येत असून मागील वर्षीही शेतमालावर चोरट्यांनी हात मारला होता मात्र चोरटे अजूनही गवसले नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.