आत्महत्येची धग...
शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट तर दुसऱ्यावर बेतली दारू
🔸केगाव ; नरसाळा येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र कायम असतांना आज आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.तर नरसाळा येथील मुरुमाच्या खड्ड्यात बुडून एकाचा मृत्यू झाला.
स्वप्निल राजू पाचभाई केगाव असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे त्याने शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले ही बाब आज सकाळी 8 च्या सुमारास वडील शेतात जाताच ही गंभीर घटना उघडकीस आली.
मृतक स्वप्नील यांच्या पश्चात आई वडील असा आप्ते परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील नरसाळा येथील दीपक देविदास रामपुरे (२० ) रा.गोंडबुरांडा येथील युवक नरसाळा शिवारातील मुरुमाच्या ढिगाऱ्यावर बसून दारू पिऊन पूर्णतः झिंगला.यात त्याचा तोल जाऊन खाली पाणी भरलेल्या खड्ड्यात पडला यातच त्याचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली.