आत्महत्येची धग....
सालदाराने घेतला विषाचा घोट
🔸शेतात आढळला मृतावस्थेत
🔸म्हैसदोडका येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात आत्महत्येची धग कायम असतांना आज मंगळवारला म्हैसदोडका येथे सायंकाळी ७ वाजताचे सुमारास सालदाराने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
जीवन गणपत जांभुळकर (४७) असे विष प्राशन करून जीवनयात्रा संपविलेल्या सालदाराचे नाव आहे.
येथील एका शेतकऱ्यांकडे जीवन हे सालदार म्हणून काम करायचे.नेहमी प्रमाणे शेतात गेले मात्र उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने शेतमालक शेतात गेले असता जीवन हे मृतावस्थेत आढळले.
दरम्यान , त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे.अद्यापपावेतो आत्महत्येचे कारण समजू शकले नसून मृतकाच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व विवाहित मुलगी आहे.