आत्महत्येची धग...
म्हैसदोडका येथील महिलेने घेतले विष
🔸ऐन सणासुदीच्या दिवसात गावकऱ्यात शोककळा
तालुक्यातील म्हैसदोडका येथील ६० वर्षीय महिलेने स्वगृही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दि.५ रोजी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली.ऐन विजयादशमी दिनी घडलेल्या दुर्देवी घटनेने गावात पुरती शोककळा पसरली आहे.
लता मनोहर डाहुले असे विष प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे.विजयादशमी सण सर्वत्र साजरा करण्यात येत असतांना डाहुले कुटुंब घरीच होते.अशातच महिलेने भर दुपारी विष ग्रहण केले.
लागलीच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.मृतक महिलेच्या पश्चात पती ,दोन मुले , दोन मुली, सुना , नातवंड असा आप्तपरीवार आहे.या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.