खळबळजनक...
जनहीतचे गौरीशंकर खुराणा यांचेवर अँट्रासिटी चा गुन्हा दाखल
🔸मारेगाव येथील महिलेने केली पोलिसात तक्रार
मारेगाव तालुक्यात जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा यांचेवर आज शनिवारला मारेगाव पोलिसात जातीयवादक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.या घटनेने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
मारेगाव येथील महिला व तिचे पती हे मागील जून महिन्यात करणवाडी शिवारात असलेल्या शेत सर्व्हे गट नंबर ११० मधील नागमंदिर नजीक गेले होते.यावेळी संशायित आरोपी हा मंदिरा जवळ येऊन फिर्यादी व तिच्या पतीस जातीयवादक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी महिलेने दाखल केली.
त्यानुसार संशायित आरोपी गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा (रा.वणी ) यांचेवर कलम ३(१) , २९४ , ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.वृत्त लिही पर्यंत संशयितांस अटक झाली नव्हती.