हृदयस्पर्शी...
केरकचऱ्यात शोधतोय 'तो' स्वतःची भ्रांत..!
🔸सालेभट्टीच्या सदाशिव ची वार्धक्यातील स्वाभिमानी व आत्मनिर्भर जिंदगी केरकचऱ्यात..
मावळतीकडे वळलेल आयुष्य.पोटच्या गोळ्यापासून कायम दूर.भल्या पहाटे उठायचे .केरकचऱ्यात सकाळच्या न्याहारीची सोय व्हावी म्हणून लगबग करायची अन दिवसभर जंगलात व पुलानजीक सरपण साठी भटकंती करून भ्रांत निभावायची व उत्तरार्धातील जीवन पुढे ढकलायचंय.
हे स्वाभिमानाने व आत्मनिर्भर होऊन जीणं मनाला चिडफार अन वेदना देणारी हृदयस्पर्श वास्तव "विदर्भ सर्च न्यूज नेटवर्क" ने टिपलीय मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील ६६ वर्षाच्या सदाशिव लेतू मडावी यांची.
स्वातंत्र्याच्या अमृतवर्षातही अनेकजण पोटाला चिमटे देत जगत असल्याचे भयाण वास्तव मायभूमीत आहे.भंगार ,केरकचरातुन चार दोन आण्याची व्यवस्था होईल याची भल्या पहाटे पासून संघर्षाचं जीणं अनेकांच्या वाट्याला आलेलं आहे.
मात्र भीक मागून जीवन जगणाऱ्यांचे आकडे फुगत असतांना आत्मनिर्भरपणे आणि स्वाभिमानाने अपवादात्मक तोडके लोकं जीवन जगणाऱ्यात मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील ६६ वर्षीय सदाशिव
लख्ख म्हातारपण..काळेकुट्ट कपडे..डोक्यावर सदैव दुपट्टा..एक हातात भंगार भरलेली प्लास्टिक पिशवी..डोक्यावर सरपण त्याला दुसऱ्या हाताचा आधार..देत शंभर सव्वाशे रुपयात विकायचे अन पोट भरायचयं ही त्याची मारेगावात दिनचर्या. कुणालाही भीक मागून जगायचं नाही हा स्वाभिमानी बाणा मनाशी बाळगून वारस असतांना एकांत अन भरकटलेले जीवन जगत माझ्याकडून कुणालाही मानसिक त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेणारा सदाशिव हा मूळचा मारेगाव तालुक्यातील सालेभट्टीचा.
दोन मुलं व एक मुलगी असणाऱ्या सदाशिव यास मुले सांभाळ करीत नसल्याची खंत व्यक्त केली.आता हात थरथरतेय, डोळ्यांवर अंधारी , चालनेही कठीण होत आहे जी पण पण इलाज नाही.शंभर सव्वाशे करून भ्रांत निभावायची असं वेदनादायक पितृतुल्याला एकांताचे जीणं जगण्यास भाग पाडले.आयुष्यभर साथ देणारी अर्धांगिनी खाटेवर मुलांकडे अखेरच्या घटका मोजतेय.
या पूर्वी अज्ञात दुचाकीस्वाराने सदाशिवला धडक दिली.यात त्याचा उजवा पाय मोडला.असह्य वेदनेने विव्हळत असतांना मारेगावकरांनी लोकवर्गणीतून सदाशिववर उपचार झाले.आता चालणे होते जी, 'पण कवा कवा पाय दुखते तवा मी बसून जातो' अशा भावस्पर्शी शब्द बोलत सदाशिवचे डोळे भरून आले...!
पोटच्या गोळ्यांनी दोन हात केले अन बापाने गाव सोडले.मिळेल तिथे डोळे मिटवायचे अन सूर्योदयापूर्वी केरकचरा शोधत भ्रांत ची सोय करायची.
एवढ्यावर भागले नाही तर लुटपुटणारे हात पाय सरपण शोधत विकायचे अन स्वाभिमानाने जीवन जगण्याचा विडा उचलणाऱ्यां सदाशिव ने उचलला आहे.
मारेगाव च्या महामार्गावर येजा करतांना नेहमीच सदाशिव डोळ्यात भरतेय.प्रस्तुत प्रतिनिधींनी त्याला बोलते करीत त्याच्या निरागस चेहऱ्यावरील वेदना लुटपुट शब्दात प्रकट करीत स्वाभिमानाचा तोरा मात्र कायम दिसला.
मीच करतोय माझ्या
सरणाची तयारी...
उपकार नको कुणाचे
चुकवू केव्हा उधारी..!
हे शब्द आपसूकच आठवतेय.
देशात सर्वत्र मांगल्याचा सण साजरा होतोय.प्रत्येकाच्या घरात चटकदार खवय्याचे चोचले पुरविले जाते.चकाकणारे दिवे , अंधारातून प्रकाशाचे संभाव्य स्वप्ने अनेकांना दिवसा पडताहेत.मात्र हा वासुदेव भ्रांत भागविण्यासाठी कधी रस्त्याच्या कडेला बसून भंगार शोधतोय तर कधी काटेरी झुडपात जाऊन सरपण आणून विकतो. आणि नगदी स्वरूपात शिवभोजनात जावून पोटाची खळगी भरतोय.
त्याच्या उत्तरार्धाच्या आयुष्यात अंधकारमय जीवनात समाधानाची , शांततेची लकेर या दिवाळीत आरोग्याच्या अन प्रकाशाचा दिवा कुणी लावेल काय ? हा खरा प्रश्न चिंतनीय असला तरी सर्वांकडे याचे उत्तर शून्य आहे.