आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मनस्वी ला तिहेरी सुवर्ण पदक
यवतमाळ जिल्ह्यातील मुळगाव बोटोणी सध्या राहणार कोंढवा बुद्रुक, पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे हिने नुकत्याच माले, मालदीव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये अंडर फाईव्ह मुली या गटात १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर स्पीड स्केटिंग रेस मध्ये ३ सुवर्ण पदक पटकावले,
मनस्वी च्या गटात स्विझर्लंड, मालदीव आणि भारत या देशातील मुलींनी भाग घेतला होता, ह्या स्पर्धे चे आयोजन रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ मालदीव यांनी माले, मालदीवची राजधानी येथे आयोजित केली होती.
या स्पर्धेसाठी बांगलादेश, स्विझर्लंड , इटली, मालदीव व भारत या देशातून स्पर्धकांनी भाग घेतला होता मनस्वी ने आत्तापर्यंत राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमधून एकूण 42 सुवर्णपदके मिळविले आहे,
तिच्या या यशाकरीता ती स्वतः व तिचे पालक फार मेहनत घेतात. प्रशिक्षक विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून विजय सरांचा तिच्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे, मनस्वीने वयाच्या अवघ्या साडे चार वर्षे वयात तीन सुवर्ण पदक जिंकून आपल्या भारत देशासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. मनस्वी च्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.