Type Here to Get Search Results !

नात गेली पळून.. आजीने विष घेतले गिळून

धक्कादायक...

नात गेली पळून.. आजीने विष घेतले गिळून

🔸मृतदेहासह नातेवाईकांचा मारेगाव पोलीस स्टेशन समोर ठिय्या 
   
मारेगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन नात ..प्रेमात आकंठ बुडाली..प्रेम बहरत असतांना..प्रियकरासोबत भुर्रर्रकन पळाली.. हा धक्का असह्य झाल्याने..आजीने चक्क उंदीर मारण्याचे औषध ग्रहण केले..आणि गतप्राण झाली. आजीच्या मृत्यूचा टाहो फोडत..मृतदेह चक्क ठाण्यात आणला..अन मुलीला तात्काळ आणून देण्यासाठी..गणगोतांनी चक्क मारेगाव पोलीस स्टेशन समोर...ठिय्या आंदोलन केले...तणावसदृश परिस्थितीवर तब्बल एक तासाने हाताळण्यात पोलिसांना यश आले.
      
मारेगाव तालुक्यातील खैरगाव (भेदी ) येथील २१ वर्षीय तरुण व १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील काही वर्षांपासून प्रेमात आकंठ बुडाले.हळुवार रंगीबेरंगी प्रेम बहरत असतांना त्यांनी पळून जाण्याचा बेत आखला आणि त्यावर शिक्कामोर्तबही केला.मागील आठ दिवसांपूर्वी पळून गेलेल्या प्रेमयुगुलातील अल्पवयीन मुलीच्या मामाने मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
       
दरम्यान , पळून गेलेल्या नातीच्या आजीने  पलायनाचा चांगलाच धसका घेत व मुलांकडील गणगोतांनी दिलेल्या धमकीवजाने चक्क शनिवार च्या रात्रीला विष ग्रहण केले.या गंभीर अवस्थेत तिला पांढरकवडा रुग्णालयात दाखल केले व डॉक्टरांनी आजी गिरजाबाई नागो मांजरे (६०) हिला मृत घोषित केले.
      
या गंभीर घटनेने नातेवाईकात प्रचंड संतापाची लाट उसळत मृतदेह थेट मारेगाव पोलिसात आणला व मुलीला आणून द्या ..तिच्या साठी आजीने इहलोकाची यात्रा केली.ही मागणी करीत नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोरच मृतदेह ठेवत आक्रोश करीत ठिय्या केला.
    
काही वेळ तणाव सदृश वातावरण तयार झाल्याने पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल करून तपास गतिमान करण्यावर भर देण्याचे सूतोवाच करण्यावर नातेवाईकांना भर दिला.तक्रार करीत मृतदेह गावाकडे रवाना केलाय .मात्र , काही काळ तणावात असलेल्या पोलीस प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली अन तब्बल तासाभरानंतर हा तणाव निवळत प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies