आत्महत्येची धग...
अभियांत्रिक च्या विद्यार्थ्याने घेतला मारेगावात गळफास
🔸मृतक हा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजू मोरे यांचा पुतण्या
🔸उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या निर्णयाने मारेगाव सह घोडदरा येथे शोककळा
मारेगाव : प्रतिनिधी
काही दिवसाठीसाठी मारेगाव येथे काकाकडे वास्तव्याला आलेल्या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या पुतण्याने येथील प्रभाग क्रं.१३ मध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना आज शनिवारला सकाळी उघडकीस आली.या घटनेने मारेगाव सह घोडदरा येथे शोककळा पसरली आहे.
गौरव सुदेश मोरे (२२) रा.घोडदरा असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
गौरव हा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे अभियांत्रिकी च्या अंतिम वर्षाला होता.नुकतेच त्याने अंतिम वर्षाची परीक्षा देऊन मूळ गाव असलेल्या घोडदरा ता. मारेगाव येथे आला होता.
मारेगाव तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा शिवभोजन चे संचालक राजू मोरे यांचा गौरव हा पुतण्या होता.दरम्यान , दसरा मेळावा करिता काका हे मुंबई येथे गेले होते.या दरम्यान शिवभोजन केंद्र सांभाळण्याची जबाबदारी गौरव याचेवर देण्यात आली.गेल्या चार दिवसांपासून ही जबाबदारी सांभाळत असतांना काका राजू मोरे हे शुक्रवारच्या रात्री मारेगावात दाखल झाले.
दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मारेगाव येथे गौरव हा सवंगड्या सोबत थिरकला. रात्री घरातील व मित्रांनी अनेकदा त्याला मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कुणालाच प्रतिसाद दिला नाही.परिणामी आज सकाळी मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाड्याने राहत असलेल्या काका राजू मोरे हे घराच्या छतावर गेले असता जिना वरील टिनाच्या शेड असलेल्या लोखंडी अँगल ला ओढणीने गळफास घेऊन गौरव हा मृतावस्थेत निदर्शनास आला.
या घटनेने पुरती खळबळ उडाली असून उच्च शिक्षित गौरवच्या आत्महत्येला प्रेमाची किनार असल्याचे बोलले जात आहे.
मृतक गौरव याच्या पश्चात आई , वडील व धाकटा भाऊ आहे.