वसंत जिनींग निवडणूक
परिवर्तन पॅनलला वाढता प्रतिसाद
माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नियोजनाचा होणार फायदा
वणी :- संतोष बहादुरे
वणी विधानसभा क्षेत्रातील महत्वाची गणली जाणारी वसंत जिनिंगच्या निवडणुकीची रंगत वाढायला लागली असून परिवर्तन पॅनलला मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता इतर पॅनलचे धाबे दनानले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होते की काय असे वाटायला लागले आहे.
वणी विधानसभा मतदार संघातील सर्वात महत्वाची आणि राजकीय दृष्टया फायदेमंद असलेल्या वसंत जिनिंगची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण चार पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहे. यात काँग्रेस समर्थीत परिवर्तन पॅनल, सध्यास्थितीत सत्तारुढ असलेले ऍड. देविदास काळे गटाचे जय सहकार पॅनल, भाजप समर्थीत शेतकरी एकता परिवर्तन पॅनल तर कम्युनिस्ट आणि शेतकरी संघटना समर्थीत वसंत जिनींग बचाव पॅनल असे चार पॅनल एकमेकांसमोर उभे आहे. यातील काँग्रेसचे असलेले परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा योग्य रीतीने प्रचार सुरु आहे. मा. आमदार कासावार यांच्या योग्य नियोजनाचा यावेळी या पॅनलला फायदा होतांना दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये काँग्रेसची पाळेमुळे रुजून असल्यामुळे आणि मागील काही निवडणुकीतील कटू अनुभव पाहता यावेळी एकदिलाने काम करतांना दिसत आहे. काँग्रेसमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने जरी दोन गट पडले असले तरी मोठया प्रमाणात नेते परिवर्तन पॅनल सोबत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातही काँग्रेस कार्यकर्ते मनापासून परिवर्तन पॅनल सोबत फिरतांना दिसून येत असून कार्यकर्त्यांच्या भरोशावरच ही निवडणूक जिंकण्याचा आशावाद माजी आमदार वामनराव कासावार यांनी व्यक्त केला.