Type Here to Get Search Results !

करणवाडी ते कुंभा मार्गाने अवजड वाहतूक बंद करा-मनसेची मागणी

करणवाडी ते कुंभा मार्गाने अवजड वाहतूक बंद करा-मनसेची मागणी 

🔸अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करू 
मारेगाव:- प्रतिनिधी 
करणवाडी ते कुंभा मार्गाने अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सदर रस्ता ची चाळणी झाली असुन अपघातात ही वाढ झाली आहे. त्यामुळे मनसे नी आक्रमक पवित्रा घेत तात्काळ वाहतूक बंद न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

कोळसा वाहतुकीकरीता मारेगाव ,करंजी वडकी हा मार्ग मुख्य रस्ता दिला आहे मात्र टोल टॅक्स चुकवण्याच्या नादात करणवाडी मार्गे वाहतूक सुरु आहे. तालुक्यातील करणवाडी,कुंभा,खैरी दरम्यान रात्रीच्या वेळेस अवैधपणे जड वाहतूक केल्या जात आहे. सदर रस्त्याची क्षमता ही जड वाहतुकीसाठी नसल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. असा आरोप मनसे नी केला आहे. पुढे निवेदनात म्हटलं आहे की, या आधीच रेती तसेच मुरूम वाहतुकीमुळे पूर्णपणे रस्त्याची चाळण होऊन रस्ता खराब झालेला आहे. आणि सध्या करणवाडी ते खैरी रस्त्याने अवैधपणे कोळसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.मारेगाव तालुक्यातील करणवाडी कुंभा ते खैरी हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु आहे. अशातच ही अवजड वाहतूक सुरु झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा वाहतुकीकरिता मारेगाव, करंजी, वडकी हा मार्ग दिला असतांना सुद्धा वाहन चालक जवळचा मार्ग म्हणून हा रस्ताने वाहतूक करीत आहे. ह्या रस्त्याने खाजगी शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात ये-जा असते . त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आह.येत्या आठ दिवसात ही अवैध जड वाहतूक बंद न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळेस तालुका अध्यक्ष अविनाश लांबट ,जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहराध्यक्ष नबी शेख, मनविसे तालुका अध्यक्ष लाभेश खाडे, मारेगाव शहराध्यक्ष मनविसे चांद बहादे, आकाश खामणकर, वसंता घोटेकर,प्रशांत चौधरी,विनय रोगे,पिंटू राजूरकर,मारोती तुराणकर,अंकुश वैद्य, आशिष खंडाळकर यास असंख्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies