आज आपल्या देशाला स्वातंत्र्याची 75 वर्षे लोटून अमृत महोत्सव साजरा करीत असताना मात्र आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. जल, जंगल व जमिनीवर मूठभर धनदांडग्यांच्या कब्जा वाढत असून पिढ्यानपिढ्या जंगल व जमिनीवर राहत असलेल्या मूळ निवासीयांना हाकलुन लावल्या जात आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षण, आरोग्य व रोजगार ह्या मूलभूत अधिकाराला सत्ताधारी केराची टोपली दाखवीत आपल्या जवाबदारी पासून हात झटकत आहेत. या साठी जनतेने आपल्या मूलभूत अधिकाराच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे व हा संघर्ष करणेच म्हणजे खऱ्या अर्थाने शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या कार्याला पुढे नेणे होय आणि तसा संकल्प करून कार्याला लागणे म्हणजेच त्यांचा जयजयकार होय.
असा संदेश समाजाला देत वेगाव येथे क्रांतिविर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी त्यांच्या प्रतिमेला हार घालत जल, जंगल, जमीन आमच्या हक्काची , नाही कोणाचा बापाची, बिरसा मुंडा जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाला भीमा मेश्राम, मुन्ना सिडाम्, बंडू किनाके, राजू चायकाटे, गजू मेश्राम, , विजय चायकाटे गजानन किनाके, संजय चायकाटे, सिमा मेश्राम ,अमृता किनाके झिंगाबाई चायकाटे, प्रेमिला किनाके , व मोठया संख्येने लोक उपस्थित होते.