वाघाच्या हल्यात युवक ठार
🔸भुरकी (रांगना) शेतशिवारातील घटना
🔸शेतकरी शेतमजुरात दहशतीचे वातावरण
तालुक्यातील भुरकी (रांगना) शेत शिवारात एका २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याची वाघाने शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभय मोहन देऊळकर असे मृतक युवकाचे नाव आहे.
अभय मोहन देऊळकर हा नेहमीप्रमाणे नदीकाठालगत असलेल्या त्यांचेच मालकीचे भुरकी (रांगना) शेत शिवारातील शेतात गेला होता. नदी काठालगत तो बैल चारत असताना. दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला व अभयला ठार केले.
दरम्यान वनविभागासह महसूल प्रशासनाला कळविण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागाचे मंडल अधिकारी डांगाळे, तलाठी निकम यांनीही तात्काळ घटनास्थळ गाठले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आला.
वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता वनविभागाने नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करावे. तसेच देऊळकर परिवाराला आथिर्क मदत द्यावी अशी मागणी गावपरिसरातून होत आहे.