आत्महतेची धग
विष घेत युवकाने संपवले जीवन
तालुक्यातील सुकनेगाव येथे राहत असलेल्या, 27 वर्षीय युवकाने विषारी औषध पीत जीवन संपवल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
अनील मारोती अंड्रसकर.27 असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह सुकनेगाव येथे वास्तव्यास होता. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. बुधवार दि. 2 नोव्हेंबरला रात्री त्याने विष प्राशन केले.ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे. त्याने आत्महत्या का केली हे अजून अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.