शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या
सततच्या नापिकी मुळे तालुक्यातील पिंपरी कायर येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.विजय महादेव नवले (62) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. पिंपरी कायर येथील रहिवासी असून त्यांच्या कडे 6 एकर जमीन आहे. शेती करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.सतत होत असलेल्या नापिकी मुळे ते चिंतेत होते. कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असतांना त्यांनी दि 8 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता राहते घरी मोनोसिल हे विषारी द्रव प्राशन केले.घरी कोणीच नसल्याने व पत्नी अपंग असल्याने ही बाब कोणाचाही लक्षात आली नाही. या मध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.