अमित राजेश दुर्गे याची SSB SOLDER या पदासाठी निवड
दिनांक 07/11/2022 रोजी GD या पदासाठी SSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा विद्यार्थी अमित राजेश दुर्गे याची SSB SOLDER या पदासाठी निवड झाली, दिनांक 12/11/2022 ला त्याचा अभिनंदन व सत्काराचा कार्यक्रम स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रविण खंडाळकर सर व मार्गदर्शक म्हणून नरवाडे सर, तसेच प्रविण पोटे सर हे लाभले होते,
मान्यवरांनी स्पर्धा परीक्षेबाबत मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पायघन यांनी केले प्रास्ताविक संतोष कनाके यांनी केले. सत्कारमूर्ती अमित दुर्गे आणि प्रज्योत कापसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व शंकर सिडाम यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यसिकेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.