तालुक्यातील नरसाळा येथील शेतकरी रामदास केशवराव ठाकरे वय ६० वर्षे यांनी आज सकाळी अंदाजे चार ते पाच च्या दरम्यान कीटकनाशक प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.
निसर्गाच्या लहरीपणा मुळे गरजा भागविण्यापुरते तरी उत्पन्न होईल की नाही, किंबहुना होणारच नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी ह्या विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.
रामदासजी ठाकरे यांनी शेतीसाठी बँकचे तसेच खाजगी कर्ज घेऊन शेती केली , मात्र निसर्गाच्या प्रकोपाणे शेतीचे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला ह्या विवंचनेतून त्यांनी आज सकाळी 4 वाजताचे दरम्यान, शेतात विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली त्यांचा पश्चात पत्नी एक विवाहित मुलगा व नातवंड असा आप्त परिवार आहे त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.