मारेगाव :- प्रतिनिधी
दिनांक 24/01/2023 रोजी यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या विभागीयस्तरीय 19 वर्षाखालील खेळामध्ये मध्ये कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव ची 11 वि कला शाखेची विद्यार्थिनी वर्षा विनोद आत्राम हिने भाला फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे तिने प्राप्त केलेल्या यशामुळे तिची निवड राज्यस्तरीय भाला फेक स्पर्धेसाठी झाली आहे. तिने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे विविध स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.वर्षा ही मारेगाव तालुक्यातील खंडणी येथील रहिवाशी आहे. मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल आहे तसेच विकासच्या दृष्टीने इतर तालुक्याच्या तुलनेत मागासलेला आहे तरी सुद्धा खंडणी सारख्या लहानशा गावातून येऊन तिने मिळवलेले यश हे खरच कौतुकास्पद आहे . तिला मुळातच लहानपणा पासून मैदानी स्पर्धेमध्ये आवड असल्यामुळे ती नियमित पणे सराव करत होती .
वर्षा ही विद्यार्थिनी ग्रामीण भागातून येतात तसेच सामान्य शेतकरी कुटुंबातील आसल्यामुळे तिचे विशेष करून कौतुक केले जात आहे. मारेगाव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागासलेला समजला जातो परंतु असे असून सुद्धा कला वाणिज्य विज्ञान क.महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम सर्व प्राध्यापकाकडून वेळोवेळी केल जात. महाविद्यालयांचे असलेलं भव्य पटांगण विद्यार्थ्यांना खेळा प्रती उत्साह द्विगुणित करते. विद्यार्थ्यांकडून नियमित पणे क्रीडा शिक्षकाने करून घेतलेला सराव तसेच विद्यार्थांची खेळा प्रती असलेली तळमळ,आत्मीयता या सर्व बाबींमुळे वर्षाने यश संपादन केलेलं दिसून येतात. त्यामुळे तिच्या या कठीण मेहनतीचे तिला फळ मिळालेलं आज झालेल्या स्पर्धेत तिने प्राप्त केलेल्या यशातून निदर्शनास येते.
तिने तिच्या यशाचे श्रेय मारेगाव तालुका क्रीडा संयोजक काकडे सर व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर व प्रा. चिंचोलकर सर आणि तिच्या आई वडिलांना दिले आहे .
वर्षा ने मिळवलेल्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे सर व प्राचार्य हेमंत चौधरी सर तसेच प्रा. कुरेकर सर प्रा.आवारी मॅडम प्रा. मस्की मॅडम. प्रा. सातपुते मॅडम प्रा. बेतवार मॅडम प्रा. चिंचोलकर, प्रा. चोपणे प्रा. दानखेडे प्रा. कुचणकर मॅडम प्रा. धणोरकर मॅडम प्रा. नयना आवारी मॅडम, प्रा. मडावी प्रा. प्रविण पोटे,निलेश बेंडे विकास ढोके* यांनी वर्षा चे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.